सन 1979 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एकत्र आलेल्या त्यावेळच्या तरुणांमध्ये जनसेवेचा ध्यास होता. किंबहुना, सामाजिक अभिसरणासाठीच हे तरुण एकत्र आले होते. त्यामुळेच नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे रक्तदान असो अगर कोणती आपत्ती आमचे मंडळ हिरीरीने पुढे येत असते. अर्थात, मेहनतीची तयारी तरुणांची आाहेच; पण, पैशाचे सोंग आणणार कुठून?
नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
पांचपाखाडी, ठाणे (पश्चिम) - ४००६०२
- ०२२ २५३४ ८२८२, २५३४ ६९६९